शैक्षणिक अपडेट 2022 : राज्यात 20 फेब्रुवारीला होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी भरण्यासाठी आता 31 जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने पत्रक आपल्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध केले आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सदर निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला असून, पुढील तारखे बाबत यथावकाश परिस्थिती पाहुन निर्णय घेतला जाणार आहे.