जॉब अपडेट्स 2021: पुणे महानगरपालिकेत अंतर्गत विविध 203 पदासाठी भरती केली जाणार असून त्यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली. या अधीसुचनेनुसार विविध पदांसाठी ही भरती होत असून, त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावे.
पद, शैक्षणिक पात्रता व अनुभव
▪️ समुपदेशन – एमएसडब्लू आणि काउन्सिलिंग डिप्लोमा, तसेच एक वर्षाचा अनुभव.
▪️समूहसंघटिका – एमए (मानसशास्त्र किंवा समाजशास्र), एक वर्षाचा अनुभव.
▪️कार्यालय सहाय्यक – बारावी उत्तीर्ण, टायपिंग- मराठी आणि इंग्रजी. दोन वर्षांचा अनुभव.
▪️ व्यवसाय गटप्रमुख मार्गदर्शक – बी. कॉम किंवा पदवीधर, समाज विभागात पाच वर्षांचा अनुभव.
▪️ संसाधन व्यक्ती – एम.कॉम. आणि पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागातील दोन वर्षांचा अनुभव.
▪️ विरंगुळा केंद्र समन्वयक – बारावी उत्तीर्ण. पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागात एक वर्षांचा अनुभव.
▪️ सेवा केंद्र समन्वयक – दहावी उत्तीर्ण आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा किमान अनुभव.
▪️ सेवा केंद्र मुख्य समन्वयक – सातवी उत्तीर्ण, व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण असावा.
▪️ स्वच्छता स्वयंसेवक – चौथी पास आणि एक वर्षाचा अनुभव.
▪️ संगणक संसाधन व्यक्ती – बारावी उत्तीर्ण, कंप्यूटर कोर्स आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता
एस. एस. जोशी हॉल,
५८२ रास्ता पेठ,
टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी
पुणे -११
सूचना : (या भरतीसाठी अर्जदारांनी स्वतः सर्व कागदपत्रांसह पत्त्यावर उपस्थित राहणं आवश्यक)
आवश्यक कागदपत्रे
▪️ जन्मतारखेचा दाखला
▪️ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
▪️ विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र
▪️ ओळखपत्र
▪️ टायपिंग उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र
▪️ शैक्षणिक प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 आणि 21 सप्टेंबर 2021