प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाईन बदल्या प्रोसेस सुरु! अतिरिक्त मुख्य सचिवा कडून परिपत्रक जारी.

शिक्षक बदली 2022 अपडेट : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाईन बदल्या प्रोसेस सुरु करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद ( सर्व ) यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबावत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे . या बाबत संदर्भ ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक , जिपव ४८२० / प्र.क्र . २ ९ ० / आस्था . या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. राजेश कुमार,  अतिरिक्त मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन  यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.

सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांबाबतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे .

सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाांधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी , असे अपेक्षित आहे .

१ ) बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी .

२ ) विशेष संवर्ग भाग -१ मधील शिक्षकांची यादी .

३ ) विशेष संवर्ग भाग -२ मधील शिक्षकांची यादी .

४ ) निव्वळ रिक्त पदांची यादी ( Clear Vacancy )

५ ) संभाव्य रिक्त पदांची यादी .

६ ) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे . प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव ,

उपरोक्तप्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक २०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची आपण घ्यावी . वरील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

Spread the love

Leave a Comment