शैक्षणिक अपडेट्स : सन २०२१ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए.टी.के.टी.साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर -ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार असून, बोर्डाकडून त्या संदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे . त्यानुसार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येत आहे .
इ .१० वी प्रात्यक्षिक , श्रेणी , तोंडी परीक्षा मंगळवार दिनांक २१ / ० ९ / २०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ व इ .१२ वी प्रात्यक्षिक , श्रेणी , तोंडी परीक्षा बुधवार दिनांक १५ / ० ९ / २०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत . उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक २७/०८/२०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे . परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल . त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे . अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरु नये , याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे सूचित केले आहे.