मोठी बातमी | 10 वी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्या, विद्यार्थ्यांसाठी दिलासा.

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून,  कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत असे,  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

परीक्षा मे व जुन मध्ये होणार 

सदर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला.

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही.

Spread the love

Leave a Comment