शैक्षणिक अपडेट : राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक 23 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये माझे संविधान माझा अभियान उपक्रम राबवणे बाबत शासन आदेश नुकताच जारी केला आहे.शासन परिपत्रकानुसार भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे .भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार , सुजाण आणि सुसंस्कृत होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर , २०२१ या कालावधीत “ माझे संविधान , माझा अभिमान ” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे .
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत . या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन , काव्य लेखन , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , घोषवाक्ये , पोस्टर निर्मिती इ . अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन / ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे . यामध्ये शाळा , विद्यार्थी , पालक , लोकप्रतिनिधी , विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा . तसेच या कालावधीत शाळा , कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे .
शाळेतील विद्यार्थी , शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश , संविधान आणि शिक्षण इ . विषयावर परिसंवाद , तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे . ” माझे संविधान , माझा अभिमान ” उपक्रम अंतर्गत जीआर मध्ये उल्लेख केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
डाउनलोड जीआर : येथे क्लिक करा.