चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य समीर दलवाई यांची महत्वपूर्ण माहिती
शैक्षणिक अपडेट्स : राज्यात आता कोविड 19 पेशंट आढळण्याचा दर कमी झाला आहे. कोरोनाची लाट बऱ्यापैकी ओसरली आहे . तसेच ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु केले जाणार असून त्याच वेळी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याने लवकरच शाळांची घंटा वाजण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे .
राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत पालकही सकारात्मक आहेत . या पार्श्वभूमीवर ‘ चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य समीर दलवाई यांनी शाळा सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली . ते म्हणाले की , ‘ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळांनी पूर्ण तयारी केली असल्यास शाळा उघडण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे .
ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार असले , तरी लसीकरणाचा नि शाळा सुरु करण्याचा मात्र कोणताही संबंध नाही . मुलांना कोरोना संसर्ग झाला , तरी तो सौम्य स्वरुपात असतो . मात्र , प्रौढांना होणारा संसर्ग गंभीर आहे . त्यामुळे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे .
– समीर दलवाई ( चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य
मुलांच्या लसीकरणाचा नि शाळा सुरु करण्याचा संबंध नाही . मात्र , मुलांचे लसीकरण करणेही गरजेचे आहे . तसेच कोविड प्रतिबंध नियमाचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्स कडून सांगितले जात आहे. मास्क वापरणे , सोशल डिस्टन्सिंग , सॅनिटायझेशन हेच नियम पाळावे लागणार आहेत.
दरम्यान मुलांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागेल ते म्हणाले , की ‘ कोविडमुळे ही मुले दीड वर्षांपासून घरात आहेत . शाळा सुरु करताना , या मुलांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागणार आहे . सुरुवातीच्या काळात अभ्यास एके अभ्यास न करता , मुलाचे ‘ सोशल रिहॅबिलिटेशन ‘ कराले लागेल . शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलावण्या बाबत नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.