शैक्षणिक अपडेट्स : शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यामधील योजनेस पात्र शाळांपैकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस मिळणार असून सदर उपक्रमांतर्गत ज्वारी , बाजरी , तांदूळ , नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक व Whole Wheat Flour , Refined Wheat Flour with Iron Enrichment , Sugar Powder , Edible Oil , Skimmed Milk Powder , Flavour and other essential ingredients असे इतर उपघटकांपासून तयार करण्यात आलेल्या न्यूट्रिटिव्ह स्लाईस प्रामुख्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. संपूर्ण माहितीसाठी दिलेला जीआर pdf वाचावी.
शाळास्तरावर पुरवठा करण्याकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्या स्तरावर ई निविदा प्रक्रिया राबवून दिव्या एस.आर.जे फूड्स एलएलपी , जालना या संस्थेची निवड करुन उक्त संस्थेसोबत संदर्भ क्र . २ अन्वये करारनामा करण्यात आला आहे . त्याकरीता शासकीय शाळांमध्ये असलेली पटसंख्या व इतर अनुषंगिक माहिती जिल्ह्यांकडून संदर्भ क्र . ३ च्या पत्राद्वारे मागवण्यात आली होती .
त्यानुसार शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्युट्रीटीव्ह स्लाईस उपलब्ध करुन देण्याकरीता दिव्या एस . आर . जे फूड्स एलएलपी , जालना या संस्थेकडे मागणी नोंदवून पुरवठ्यापश्चात शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करणेबाबत सदर संस्थेस निर्देश देण्यात येत आहेत .
डाउनलोड जीआर : येथे क्लिक करा