शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! जुनी पेन्शन योजना संदर्भात शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.

शैक्षणिक अपडेट : राज्यातील सुमारे ३५ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासाठी आनंदाची बातमी आहे.जुनी पेन्शन योजना लागू कारण्या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त केलेल्या सुमारे ३५ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाची जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली शासन स्तवरून सुरु झाल्याने शिक्षक वर्गात दिलासदायक वातावरण आहे.

दरम्यान  हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर होणार असून, त्यास मंजुरी मिळाल्यास नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित,वाढीव तुकड्यावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे.

राज्याच्या विविध विभागांतील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार व विविध शिक्षक संघटनांनी वर्षानुवर्षे पाठपुरावा व आंदोलने केली आहेत.परंतु आता आगामी निवडणुका आणि हजारो शिक्षकांची मागणी आणि मानसिकतेचा सकारात्मक विचार करून शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य सरकारने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर सध्या तरी शिक्षकव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Spread the love

Leave a Comment