मा . शिक्षण संचालक मा . व उ मा . पुणे यांचे पत्र क्रमांक 213/2022 , दिनांक 12.01.2022 उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता अदा करणेबाबत तसेच अनुदानाची स्थिती विचारात घेऊन दुसरा हप्ता अदा करणेबाबत कळविले आहे . सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसन्या हप्त्याच्या देयकाबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे .
१ ) सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याचे देयक ज्या शाळांची अद्याप सादर केले नाही , अशा शाळेनी देयके सादर करावीत . यापुर्वी ज्या शाळांनी देयक सादर केली आहेत . अशा शाळांनी पुन्हा देयक सादर करण्याची आवश्यकता नाही .
२ ) सातव्या वेतन आयोगाच्या दुसन्या हप्त्याचे देयक सादर करताना भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करावयाचे देयक , डीसीपीएस धारकांसाठी रोखीने अदा करावयाचे देयक , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करावयाचे देयक व मयत कर्मचाऱ्यांना रोखीने एक रकमी अदा करावयाचे देयक अशी स्वतंत्र देयके सादर करावीत .
३ ) देयकासोबत फरक तक्ते व वेतन पडताळणी आदेश जोडावेत .
४ ) मयत कर्मचान्यांच्या बाबतीत मृत्यु प्रमाणपत्र देयकास जोडावे .
५ ) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नावापुढे सेवानिवृत्ती दिनांक नमूद करावा .
६ ) देयकामध्ये भविष्य निर्वाह निधी क्रमांक , डीसीपीएस / एनपीएस क्रमांक नमूद करावा .
७ ) फरक तक्ते मुख्याध्यापक स्तरावर तपासणी करावीत . कोणत्याही कर्मचान्यांस जादा रक्कम अदा होणार नाही , याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी .
८ ) उपरोक्त देयक दिनांक 25.01.2022 पर्यंत या कार्यालयात सादर करावे . सदर दिनांकानंतर सादर होणाऱ्या देयकांचा विचार केला जाणार नाही , याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील , याची नोंद घ्यावी .
९ ) देयकासोबत खालील प्रमाणपत्र जोडावे . नमुना प्रमाणपत्र सदर देयक मी स्वतः तपासून पडताळणी केलेली आहे . देयक नियमानुसार बरोबर व देय असल्याची मी खात्री केली आहे . सदरचे देयक यापूर्वी मी सादर केले नाही व संबंधितांना यापूर्वी कधीही अदा केले नाहीत , याची मी खात्री केलेली आहे .