शैक्षणिक अपडेट : राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन लावण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मान्य केला आहे. यापुढे राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी आता महास्टुडन्ट अॅपद्वारे नोंदविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी शालेय शिक्षण विभागाला सदर प्रस्ताव दिला होता.
राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी आता महास्टुडन्ट अॅपद्वारे नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे . त्यामुळे राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती आता एका क्लिकवर समजायला मदत होणार आहे .
महास्टुडन्ट अॅपची कार्यपाद्धती –
- तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा , शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे .
- भारत सरकारने प्रोग्राम्स गार्डिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला आहे . यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठी स्टोअरवर महास्टुडन्ट नावाने उपलब्ध आहे .
- या ॲपमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
- शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती सहजपणे नोंदविता येणार आहे .
- याच सोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदणीची . सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे .
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळां या संदर्भात मोठया प्रमाणावर कामकाज होत आहे. यामध्ये राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा , शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरणे याच बरोबर भारत सरकारने प्रोग्राम्स गार्डिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला आहे . यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठीराज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.