नोकरी अपडेट्स : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी संधी. राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ ड गट ’ कर्मचारी भरती केली जात आहे.यामध्ये भरती प्रक्रिया २०२१ जिल्हा व सत्र न्यायालय , पुणे यांच्या कडून खालील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
पुणे जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील जागा
पद : सफाईगार
संख्या : 24 ( यात वाढ होण्याची शक्यता )
सदर ‘ सफाईगार ‘ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून त्यानंतर त्यातील एकूण २४ उमेदवारांची मेरिट नुसार निवडसूची / प्रतिक्षासूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
सदर भरतीप्रक्रियेची विस्तृत जाहिरात , अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय , पुणे अधिकृत संकेतस्थळ
https : // districts.ecourts.gov.in/pune वर
दिनांक ३१-०५-२०२१ चे कार्यालयीन वेळेपासून उपलब्ध राहील .