शैक्षणिक अपडेट : राज्यात राज्यात पहिली ते बारावी पर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्र पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, प्री प्रायमरीचे वर्ग ही सुरू करण्याचा विचार करीत असून याबाबत लवकरच निर्णय
होणार आहे. सर्व वर्गातून शाळा सुरु करण्यासाठीची मागणी पालक वर्गातून होत होती व सध्या कोरोना रुग्ण वाढीचा दर ही घाटला आहे. यामुळे शिक्षण विभागाने शाळा सोमवार पासून सुरु करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री यांच्या कडे पाठवला होता. आता त्याला मंजुरी मिळाली असून सोमवार असून पुन्हा पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत.
कोरोना टास्क फोर्सनेही शाळा सुरु करण्यासाठी काही हरकत नसल्याचे सांगिले होते. याशिवाय राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी शासन प्रयत्न मोठया प्रमाणात करीत आहे. शाळेतच लसीकरण करण्यासाठीचे नियोजन आरोग्य विभागाकडून केले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रकडून समजते.