राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय, आता पुस्तकांसोबतच वह्या मोफत देण्याची घोषणा ..!!

Dipak kesrakar

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्याही मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे . यामुळे पालकांचा आर्थिक भार आणखीन कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

सध्या बाजारातील वाह्यांचे दर पाहता पालकांना आपल्या मुलांसाठी दरवर्षी वह्या घेणं आर्थिक दृष्टीने परवडत नाही . त्यामुळे आधी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी म्हटलं होतं. मात्र, सदर प्रोसेस सोयीस्कर नसल्याने आता विद्यार्थ्यांना थेट वह्या मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्राकडून कारण्यात आली आहे.

राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय अपडेट ..

सध्या राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनकडून जाहीर कारण्यात आला असून, त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत, या संदर्भात बोलताना केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी व अतिरिक्त शिक्षकांची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल.

दरम्यान राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्या, तरी तेथील विद्यार्थ्यांचे शेजारील जवळच्या शाळांमध्ये समायोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना शाळा लांब पडत असल्यास त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली.

Spread the love

Leave a Comment