विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही भागात स्थलांतरित झाल्यावरही शिक्षण मिळत राहावे म्हणून शिक्षण विभागाने ‘शिक्षण हमी कार्ड’ या योजनेची सुरुवात केली आहे. राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांचे सातत्याने स्थलांतर सुरू असते. असे विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागात गेले तरी त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळावा व शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी शासनाने अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड दिले आहे. या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व मूळ गावातील मुख्याध्यापकांचे संपर्क क्रमांक या कार्डवर देण्यात आले आहेत.
योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबधित यंत्रणेस मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर अहवाल संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनी तात्काळ म्हणजेच २७ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना आहेत.
डिसेंबरमध्ये स्थलांतरितांचे सर्वेक्षण
डिसेंबर महिन्यात विविध भागांतून स्थलांतरांना प्रारंभ होत होणार असून, विहित नमुन्यात म्हणजे शिक्षण हमी कार्ड मध्ये सदर माहितीचे संकलन केले जाईल. यासाठी कोणत्या भागातून किती लोकांचे स्थलांतर होऊ शकते, याचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी संबंधित शिक्षण अधिकारी यांनी दिल्या आहेत.
तालुकानिहाय बालरक्षकांची आकडेवारी
शिक्षण विभागातर्फे बालरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी १८०, वसमत ८४, औंढा नागनाथ ८२ तर हिंगोली ५०, सेनगाव ५० अशी तालुकानिहाय बालरक्षकांची आकडेवारी आहे.
शिक्षण हमी कार्ड परिपत्रक – डाउनलोड करा