Teacher Exam : राज्यातील शाळाच्या गुणवत्तेचा दर्जा ढासळा असून तो सुधारण्याची गरज असून, त्यासाठी आता शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. मराठवाड्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या शिक्षकांना दर वर्षी परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती विभागीय केंद्रीय आयुक्त सुनील केंद्रीकर यांनी दिली आहे. शाळाच्या गुणवत्तेचा दर्जा ढासळा असून तो सुधारायचा असेल तर शिक्षकांच्या अशा परीक्षा घेतल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
सदर परीक्षा ही दर वर्षी आयोजित केली जाणार असून, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. या परीक्षेत एखादा शिक्षक नापास झाला तरी, याचा त्याच्या कोणत्याही बाबीवर परिणाम होणार नाही. तसेच ही परीक्षा कोणालाही अनिवार्य असणार नसून ती ऐछिक असणार आहे. मात्र सर्व शिक्षकांनी ही परीक्षा द्यावी असे अहवान विभागीय केंद्रीय आयुक्त सुनील केंद्रीकर यांनी केले आहे.
दरम्यान सदर परीक्षेला मराठवाड्यातील शिक्षकांनी विरोध केला असून, अशा परीक्षेची काही आवश्यकता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यासाठी शासन स्तरावर तसेच स्थानिक पातळीवरही ही गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, उपयोजना केल्या जात असतात. याचाच एक भाग म्हणून ही परीक्षा राबविली जाणार असून याला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.