राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खासगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ही योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. ऊसतोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकरी व वैयक्तिक व्यावसायिकांनी या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
ऊसतोडणी यंत्राच्या अनुदान योजनेची सविस्तर माहिती , लाभार्थी निवड निकष व आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाभार्थी निवड निकष व आवश्यक कागदपत्रे