पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ! आता इतकी मिळणार शिष्यवृत्ती रक्कम.

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ! आता इतकी मिळणार शिष्यवृत्ती रक्कम.

राज्यात परीक्षा मंडळाकडून इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून एक ठराविक रक्कम दिली जात असते. यंदा पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रतिवर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजारपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

पाचवी नंतर तीन वर्ष आणि आठवीनंतर दोन वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षांत यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यास दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रतिवर्ष, तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ! आता इतकी मिळणार शिष्यवृत्ती रक्कम.

 

Spread the love

Leave a Comment