सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांबाबतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे .
सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाांधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी , असे अपेक्षित आहे .
१ ) बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी .
२ ) विशेष संवर्ग भाग -१ मधील शिक्षकांची यादी .
३ ) विशेष संवर्ग भाग -२ मधील शिक्षकांची यादी .
४ ) निव्वळ रिक्त पदांची यादी ( Clear Vacancy )
५ ) संभाव्य रिक्त पदांची यादी .
६ ) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे . प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव ,
उपरोक्तप्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक २०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची आपण घ्यावी . वरील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.