इयत्ता पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमात होणार बदल ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

 

शैक्षणिक अपडेट 2022 :महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळाचा दर्जा सुधारण्यासाठी सध्या मोठया प्रमाणात शासन प्रयत्न करत आहे. मध्ये सध्या नवीन अमूलाग्र बदल घडताना दिसत आहेत. राज्यातील काही शाळा अंतराराष्ट्रीय स्तराच्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या साठी काही शाळांची निवडही करण्यात आली. आता शासन आणखीन एक पाऊल पुढे टाकून पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रम मध्ये बदल करायचे ठरवले आहे. आता जिल्हा परिषदांच्या शाळांमधून यापुढे पहिली व दुसरीसाठी आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली .

 

“ पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून जिल्हा परिषदांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर राज्यात शिक्षण देणार आहोत .”

                 – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 

पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल , हे ही पाहावे लागणार आहे . याबाबत नवीन शैक्षणिक आराखडा लाक्षत घेतला जाणार आहे. पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात तज्ज्ञ लोकांची समिती नेमून अभ्यासक्रम निर्मिती केली जाणार आहे .

Spread the love

Leave a Comment