शैक्षणिक अपडेट : देशभरात ओमीक्रोन या नव्याने आलेल्या कोरोना व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंत सर्व वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र सध्या शाळा सुरु करण्याबाबत जनमत वाढत आहे. पालक वर्गातून ही शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच शाळा सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
दरम्यान याबाबत अधिक बोलताना 15 दिवसांनी कोरोना बाबत सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लहान मुलात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी असून, हॉस्पिटलाजेशन प्रमाणही खूप कमी असल्याचे दिसत आहे, म्हणून ज्या भागात रुग्ण संख्या कामी आहे त्या भागात लवकरच शाळा सुरु करणायचा निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट संकेतच दिले आहेत.
थोडक्यात –
• 15 दिवस राज्यभरातून कोरोना आढाव घेतला जाणार.
• ज्या भागात रुग्ण संख्या कमी त्या भागात शाळा सरू करण्याला प्रधान्य दिले जाणार.
• शाळा व्यवस्थापनाला कोविड संदर्भात सर्व नियम पाळावे लागणार.
• रुग्ण संख्या प्रमाण जास्त असणाऱ्या भागात शाळा सुरु केल्या जणार नाही, तर त्या भागात ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु ठेवण्यात येतील.