महा ‘ टीईटी ‘ परीक्षा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती!! राज्य परीक्षा विभाग अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पोलीसांनी चौकशीला बोलावले !


शैक्षणिक अपडेट : 
राज्यात शिक्षक पात्रता चाचणी ( महा टीईटी ) परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यावर सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. राज्य सायबर सेलने तत्पर चौकशी करत, एक संशित व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यावर राज्य परीक्षा विभाग अध्यक्ष तुकाराम सुपे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी आज तुकाराम सुपे यांची दिवसभर चौकशी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्षच संशयाच्या भवऱ्यात अडकला आहे.

दरम्यान शिक्षक पात्रता चाचणी ( महा टीईटी ) परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सायबर सेलने प्रतिश देशमुख नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या कडे तीस ते चाळीस टीईटी अपात्र उमेदवारांची प्रवेशपत्र आढळून आली होती. त्यामुळे पेपर फुटीच्या या प्रकरणात अनेक शिक्षक, परीक्षार्थी, अधिकारी यांचा सहभाग असण्याचा संशय आहे. टीईटी पेपर चा दर हा दीड लाख ठरल्याचा प्राथमिक माहिती समोर आली असून शिक्षक असेल तर तीन लाख रुपये यासाठी मोजल्याचे काही विद्यार्थ्यांकडून बोले जात आहे. यामध्ये दहा ते पंधरा शिक्षक यामध्ये एजेंटगिरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे शिक्षक अनेक परीक्षार्थीना भेटल्याचे समोर आले आहे.

Spread the love

Leave a Comment