शासन निर्णय अपडेट : ग्रामीण भागात रस्ते वाहतूकीचे महत्व खूप आहे. त्याचबरोबर शेतीचे अंतर्गत असणारे शेत / पाणंद रस्ते ही तितकेच महत्वपूर्ण असतात. शेती विकासात हे रस्ते खूप महत्वाचे असतात. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाची महत्वकांक्षी ” मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेची ” घोषणा केली आहे. या संदर्भात जीआर सुद्धा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या योजने बाबत अधिक माहिती आपण घेणार आहोत. अधिक माहितीसाठी खाली दिलेला जीआर पहा.Matoshree Gram Sanghty farm / Pedband Road Plan
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना
१ . विविध योजनांच्या अभिसरणामधून ” पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना राबविण्यासाठी निर्गमित केलेला वाचा क्र .१ येथील दि . २७/१२/२०१८ चा शासन निर्णय व वाचा क्र . ( २ ) ते ( ५ ) येथील शासन शुध्दीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत . २. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “ मी समृध्द तर गाव समृध्द ” आणि “ गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द ” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे . शेत / पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने – आण करण्याकरीता उपयोगात येतात .
यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी , आंतरमशागत , कापणी , मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात . या यंत्रसामुग्रीची वाहतुक करण्याकरीता , बारमाही वापराकरीता शेत / पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे . त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत / पाणंद रस्ते तयार करण्याकरिता ” मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे . “ मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना ” कार्यक्षमतेने राबविण्यासाठी खालीलप्रमाणे
योजना मार्गदर्शक सूचना
३. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र . भूमापन १०८० / ६८ / ४ ९ ६६ / ल -१ , दिनांक ४ नोव्हेंबर , १ ९ ८७ अन्वये ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे . एका गावावरुन दुसऱ्या गावास जाणारे रस्ते i ) ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते ( गाव नकाशामध्ये दोन भरीव रेषाने दाखविले असून या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही . ) ग्रामीण गाडीमार्ग ( गाव नकाशामध्ये तुटक दुबार रेषाने दाखविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जाते त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शविलेले आहे , अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते एकवीस फूट आहे . ) पाय मार्ग ( गाव नकाशामध्ये तुटक रेषेने दर्शविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शविलेले आहे अशा रस्त्यांची रुंदी सव्वा आठ फूट आहे . ) शेतावर जाण्याचे पाय मार्ग व गाडी मार्ग ४ . ii ) हे रस्ते नकाशावर दर्शविलेले नाहीत . परंतु , वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसिलदारांना दिलेले आहेत .
त्यानुसार वहिवाटीचे विहित असलेले रस्ते . इतर ग्रामीण रस्ते iii ) या योजने अंतर्गत पुढीलप्रमाणे शेत / पाणंद रस्त्यांची कामे घेता येतील . i ) अस्तित्वातील शेत / पाणंद कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे . ii ) शेत / पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करुन कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे . ५ . राज्यातील सर्व शेत / पाणंद रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( जिल्हा परिषद आणि शासन ) मापदंडाप्रमाणे बांधण्यात यावेत . यात फक्त जागेच्या उपलब्धतेप्रमाणे रुंदीमध्ये फरक पडेल .
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजने विषय सविस्तर जाणून घेणेसाठी जीआर डाउनलोड करा.
डाउनलोड जीआर : येथे क्लिक करा.