शैक्षणिक अपडेट : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार पटकवणारे रणजीतसिंह डिसले गुरुजींना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. शिक्षण क्षेत्रातील कौतुकास्पद कार्यबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठ कडून रणजितसिंह डिसले (गुरुजी) यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक असणारे आपल्या नवनवी शैक्षणिक प्रोयोगाने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या डिसले गुरुजी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली.असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. आता मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने आणखीन एक सन्मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात खावला गेला आहे.
शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ ओळखले जाते. दहा लाख अमेरिकन डॉलर असे त्याचे स्वरूप आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) शाळेत मागील अकरा वर्षांपासून रणजितसिंह डिसले गुरुजी हे शैक्षणिक तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात. त्यांनी तयार केलेली ‘क्यूआर कोड’ शैक्षणिक पाठय़पुस्तके सध्या अकरा देशांतील दहा कोटींपेक्षा जास्त मुले वापरत आहेत. ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून डिसले गुरुजी दीडशेपेक्षा जास्त देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.