HSC SSC Exm 2021 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये खासगीरित्या नावनोंदणी करण्यासाठीच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे . यानुसार खासगीरित्या परीक्षेला बसण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज प्रक्रियेस नियमित शुल्कासह १३ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कसा कराल अर्ज?
खासगीरित्या दहावी , बारावी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १३ ते २७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने १७ क्रमांकाचा अर्ज भरायचा आहे . १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज आणि शुल्क जा केल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे असून, संपर्क केंद्रांनी हे अर्ज २ नोव्हेंबर रोजी विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत .
नोंदणी शुल्क किती ?
दहावीची इच्छिणाऱ्या परीक्षा खासगीरित्या देऊ विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क आहे बारावीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येईल . ऑनलाइन अर्ज भरण्यास कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत ०२०-२५७०५२०७ / २५७०५२०८ / २५७०५२७१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे .