राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे, महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा संदर्भात परिपत्रक जारी!!


शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता . २ . शासन असे आदेश देत आहे की , दिनांक १ जुलै , २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७ % वरुन २८ % करण्यात यावा . 

सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी , २०२० , दिनांक १ जुलै , २०२० आणि दिनांक १ जानेवारी , २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे . मात्र दिनांक १ जानेवारी , २०२० ते दिनांक ३० जून , २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ % इतकाच राहील . सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर , २०२१ पासून रोखीने देण्यात यावी . 

दिनांक १ जुलै , २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर , २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील . वाचा १. शासन निर्णय क्रमांक : मभवा -१३१ ९ / प्र . क्र . ३० / सेवा – ९ , दिनांक ४ जानेवारी , २०२० ) २. भारत सरकार , वित्त मंत्रालय व्यय विभाग आदेश क्रमांक १/१ / २०२० इ . ॥ ( बी ) , दिनांक २० जुलै , २०२१ ३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील . प्रत , यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात , त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा .

 अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो , त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा . शासन निर्णय क्रमांकः ममवा -२०१ ९ / प्र . क्र . ३० / सेवा ९ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२११००७१५५०५८५४०५ असा आहे . हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने .

डाउनलोड परिपत्रक : येथे क्लिक करा 

Spread the love

Leave a Comment