राजपत्रित अधिकारी संघटनेने नुकतीच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे ५८ वरून ६० करण्याची मागणी शासनाकडे केली होती. मात्र सह सचिव , जलसंपदा विभाग यांनी शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे ५८ ठेवावे ही शिफारस केली आहे. त्यांनी नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव यांना एक पत्र पाठवून ही शिफारसपर मागणी केली आहे.
सदर पत्रा नुसार , सद्य : स्थितीत शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय ५८ आहे . सदर वयोमर्यादा ५८ ऐवजी ६० करावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे . राज्यातील बेरोजगार युवकांचे प्रमाण व त्यांना शासकीय सेवेच्या अल्प संधी व त्यामुळे त्यांना येणारे नैराश्य पाहता , याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे उचित वाटत नाही . त्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्तीचे वय ५८ कायम ठेवावे , अशी विनंती सह सचिव सतीश का . जोंधळे , यांनी केली आहे.