२७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे शाळांना आदेश! परिपत्रक जारी.

शैक्षणिक अपडेट्स : २७ सप्टेंबर , २०२१ हा जगभरात जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो . युनायटेड नेशन वर्ल्ड टूरीझम ऑर्गनायझेशन ( UNWTO ) यांच्याव्दारे या वर्षी जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ” Tourism for Inclusive Growth ” ( सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ) हे घोषित करण्यात आले आहे . 

या निमित्ताने शालेय स्तरावर पर्यटन वाढ व जाणीव जागृती साठी स्पर्धा आयोजन ( उदा- शालेय मुलांच्या चित्रकला स्पर्धा व सर्वांसाठी फोटोग्राफी स्पर्धा ) करणे , पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था , व्यक्ती यांचेसोबत परिसंवाद चर्चासत्रे इ . कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहेत. तसेच सदर कार्यक्रमांची छायाचित्रे , बातमी पर्यटन संचालनालयाच्या विभागीय कार्यालयास पाठवावयांची आहेत.

Spread the love

Leave a Comment