शैक्षणिक अपडेट्स : शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिनियम पारित करण्यात आला असून त्याद्वारे राज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सर्व माध्यमाच्या , व्यवस्थापनाच्या व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे . सदर सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन यांचे कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सदर माहिती ही महाराष्ट्र राज्यातील CBSE , ICSE , IB , CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना मराठी भाषा सक्तीची अधिनियम -२०२० यास अनुसरून प्राप्त करण्याकरिता सूचित करण्यात आलेले आहे.या अंतर्गत लिंक तयार करण्यात आली आहे.त्यानुसार आपल्या अधिनस्त असलेल्या CBSE , ICSE , IB , CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना पुढील लिंकवर
https://www.research.net/r/MARATHIBHASHA
क्लिक करून लिंक मधील सर्व प्रश्नांची माहिती भरणे बाबत सूचना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी . उपरोक्त माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे.या कार्यालयास दि .३१ / ८ / २०२१ पर्यंत प्राप्त होणे आवश्यक आहे . या कारणास्तव उपरोक्त विषयाबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी .