सरकारी नोकरी : शासनाच्या समाजकल्याण विभागात विविध पद भरतीस मंजुरी, गृहप्रमुख, गृहपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई ( ड ) इ. पदासाठी होणार भरती.


नोकरी अपडेट 2021
:  केंद्र शासनाने स्थापन केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रात समता प्रतिष्ठान ही संस्था शासन निर्णय दि . २७.३.२०१७ अन्वये स्थापन करण्यात आली आहे . मागासवर्गीय मुलींसाठी सुरू करण्यात आलेली सदर ५० शासकीय वसतीगृहे , नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठीची ३ शासकीय वसतीगृहे व समता प्रतिष्ठान या संस्थेकरिता आवश्यक पदे व काल्पनिक पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. 

( Department of Social Welfare, Government of Maharashtra )

शासन निर्णय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींसाठी सुरू करण्यात आलेली ५० शासकीय वसतीगृहे , नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ३ शासकीय वसतीगृहे व समता प्रतिष्ठान या संस्थेकरिता खालील विवरणपत्रात नमूद केल्यानुसार नियमित पदे व काल्पनिक पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे . 

अ ) विभागीय पातळीवरील २५० क्षमतेच्या एकूण ७ वसतीगृहांसाठी मंजूर पदे 

ब ) १०० क्षमतेच्या एकूण ४३ वसतीगृहांसाठी मंजुर पदे

२ ) मुंबई , नागपूर व पुणे येथे नोकरी करणा – या मागासवर्गीय महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन ३ शासकीय वसतीगृहांकरिता मंजूर पदे अ . पदनाम प्रत्येक वसतीगृहासाठी  ३ वसतीगृहांसाठी पदसंख्या मंजूर पदसंख्या

३ ) नवी दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्थापन केलेल्या समता प्रतिष्ठान या संस्थेकरिता मंजूर पदे

प्रस्तुत शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र .५२६ / आपुक , दि .१ ९ .१०.२०१ ९ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे . सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०६०४१७५६१६६६२२ असा आहे . संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. 

Spread the love

Leave a Comment