शैक्षणिक अपडेट्स : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट – ब ( मुख्य ) स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके यांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक ( PSI मुख्य ) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकामध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती . त्यानुसार मानकात करण्यात आलेल्या सुधारणा एक परिपत्रक काढत जाहीर केल्या. या सुधारित मानके पुढीलप्रमाणे असतील यामध्ये –
1.शारीरिक चाचणीचे गुण आर्हताकारक करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण ( म्हणजे ६० गुण ) आवश्यक असतील तरच तो उमेदवारास मुलाखतीस पात्र असेल.तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही .
२ . तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणाची बेरीज अपूर्णाकात असल्यास तो अपूर्णाकातच ठेचून , शारीरिक चाचणीचा निकाल तपार करण्यात येईल .
३ . पोलीस उपनिरीक्षक ( मुख्य ) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे .
शारीरिक चाचणीचा तपशील :