भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी . पश्चिम रेल्वे मुंबईने अप्रैटीसच्या पदांसाठी नोकर भरती काढली आहे . एकूण 3,591 पदांसाठी भरती केली जाईल . सदर पदासाठी इच्छुक उमेदवारां कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 मेपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2021.
पोस्ट तपशील पोस्टची एकूण संख्या – 3,591
पोस्ट नाव – अप्रैटिस
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्र असावे. वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवाराचे वय शिथिल केले जाईल.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल . दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता तयार केली जाईल . तसेच या भरतीतील निवडीसाठी उमेदवाराची लेखी परीक्षा होणार आहे . तीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल .
अर्ज फी : सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज भरावे लागतील.
अर्ज कसा व कोठे करावा : इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या www.itc-wr.com या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात .
- हेही वाचा : Full Forms of abbreviated form | संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप | स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त