शैक्षणिक अपडेट : दहावीच्या परीक्षा घेण्याबाबत लवकर निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे आज हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला सुनावले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थी पास करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णया विरुद्ध प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात यांचीका दाखल केली असून, त्याला अनुसरून कोर्टाने आज सुनावणी दरम्यान सरकारला खडे बोल सुनावले.
बारावीच्या परीक्षा घेऊ शकता मग दहावीच्या का नाही? असा सवाल ही सरकारला हायकोर्टाने विचारला. दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करू शकत नाही, त्यामुळे बारावी परीक्षा बाबत जे नियोजन करणार असला त्याप्रमाणे दहावीच्या परीक्षा का घेऊ शकत नाही, या बाबीकडे हायकोर्टाचा रोख होता.
याचिका कर्त्याचे म्हणणे
दहावीच्या परीक्षा न घेता जर सरसकट दहावीच्या विद्यार्थ्यांना पास केले तर, खूप मोठा गोंधळ उडू शकतो. तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेवर ही यांचा परिणाम होऊ शकतो. प्रवेश प्रक्रियेत भ्रस्टाचार सुद्धा होऊ शकतो असे यांचीका कर्ते धनंजय कुलकर्णी यांचे म्हणे असून, दहावीची परीक्षा पास झाल्या शिवाय विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देवू नये असेही त्यांनी याचिकेत मागणी केली आहे.
आता या परिस्थिती राज्याचा शालेय विभाग, परीक्षा मंडळ किंवा राज्य सरकार काय भूमिका मांडणार बारावी प्रमाणे दहावीच्या पण परीक्षा होणार का? हायकोर्टात परीक्षा मंडळ काय बाजू मांडणार या सगळया गोष्टी कडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.
सध्या परीक्षा मंडळाकडून मूल्यांकन आराखडा बनवून तो शासनाला मंजुरीला देणार असल्याचे सोमवारी हायकोर्टात मंडळाच्या वकिला कडून सांगण्यात आले होते. तसेच सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिबा म्हणून विद्यार्थ्यांकडून मध्यस्थी याचिका दाखल करण्यात आली होती. या सगळ्या याचिकांवर लवकर निर्णय अपेक्षित.