शैक्षणिक अपडेट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा शासनाने रद्द केली, याविरुद्ध प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र आता विद्यार्थी संघटना ही परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. सरकारच्या या निर्णयाला पाठींबा म्हणून विद्यार्थ्यांनी हायकोर्टात ” मध्यस्थी ” याचिका दाखल केली आहे.
दरम्यान सोमवारी हायकोर्टात कुलकर्णी यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्या नंतर, आज पुन्हा या सगळ्या याचिकावर सुनावणी होणार आहे. परीक्षा रद्द करण्यासाठी परीक्षा मंडळ आपली बाजू मांडेल.
दहावी परीक्षा होणार की रद्द होणार यावर आज अंतिम निर्णय येणार आहे. दहावी परीक्षा रद्दच्या विरोधात याचिका दाखल झाल्या नंतर शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गात संभ्रम निर्माण झाला असून, परीक्षा बाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
दहावी परीक्षा मंडळ स्थापन करणार मूल्यांकन समिती
दहावीची परीक्षा रद्द झाली तर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आराखडा ठरवण्यासाठी एक मूल्यांकन समिती स्थापन करण्यात येणार असून, सदर समिती मूल्यांकन आराखडा तयार करून शासनास सादर करेल. शासन मंजुरी नंतर मूल्यांकन प्रोसेस सुरु होईल असे सोमवारी परीक्षा बोर्डाकडून हायकोर्टात सांगण्यात आले.