गणित विषय हा बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड किंवा रटाळ वाटत असतो, त्याची अनेक करणे आहेत, त्यातील महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतात. त्यामुळे गणित सोडवताना अडचणी येतात व विद्यार्थी तेथेच थांबतो.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात व त्यांना गणित विषयात गोडी वाढावी म्हणून ” गणित मूलभूत कोर्स ” ची रचना केली. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना गणित सोपे होऊन नक्कीच त्यांची प्रगती होईल.
मूलभूत गणित कोर्स
या प्रणालीत 0,1,2,3,4 …………… 9 . अशी दहा चिन्हे वापरतात . यांना अंक म्हणतात . हे जसे अंक आहेत तशा ह्या एक अंकी संख्यादेखील आहेत . यांच्या सहाय्याने खूप मोठ्या संख्या लिहिता येतात .
उदा . 10. ही दोन अंकी संख्या आहे . यापासून सुरुवात होऊन 11. 12 , 99 या दोन अंकी संख्यांचा गट होतो . यांच्यापुढे 100 , 101 ………….. 999. हा तीन अंकी संख्यांचा गट होतो.
अशाप्रकारे अनेक अंकी मोठ्या संख्या केवळ 10 अंकांनी लिहिता येतात . त्याच्यासाठी स्थानिक किंमत ही एक अतिशय प्रभावी युक्ती वापरली जाते .
ब ) स्थानिक किंमत :
एकापेक्षा अधिक अंकांच्या सहाय्याने संख्या बनताना अंक ज्या स्थानावर असेल त्या स्थानानुसार त्या अंकांची किंमत ठरल्याप्रमाणात वाढते आणि सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज म्हणजे ती संख्या होते .
आता एक उदाहरण पाहूया –
संख्या घेऊ – 3412 ( तीन हजार चारशे बत्तीस )
4 हा अंक शतक स्थानी म्हणून त्याची किंमत 4 ची शंभर पट 400
1 हा अंक दशक स्थानी म्हणून त्याची किंमत 1 ची दहा पट 10
2 हा अंक एकक स्थानी म्हणून त्याची किंमत 2 ची एक पट 2
म्हणजेच 3412
2.एकमान पद्धत
सर्व सामान्य माणूस सहजगत्या एका वस्तूच्या किंमती वरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकाराच्या सहाय्याने काढू शकतो .
जसे , एका पेनाची किंमत 5 रु . आहे . .
: . 7 पेनांची किंमत 5×7 = 35 रु .
तसेच अनेक वस्तूंच्या किंमतीवरून आपण एका वस्तूची किंमत भागाकार क्रियेचा उपयोग करून काढू शकतो .
जसे , 4 शर्टची किंमत 1000 रु . :: . 1 शर्टची किंमत 1000 /4 = 250 रु .
रोजच्या जीवनात केवळ एकावरून अनेक किंवा अनेकांवरून एक एवढ्या पुरताच व्यवहार मर्यादित नसतो . त्या दोन्हींचीही सरमिसळ असते . आपण दिलेल्या माहितीवरून एका वस्तूची किंमत काढू शकतो . अर्थात त्यात भागाकार क्रियेचा उपयोग होतो आणि त्या एका वस्तूच्या किंमतीवरून इच्छित वस्तूंची किंमत आपण काढू शकतो . अर्थात इथे , आपल्याला गुणाकार क्रियेचा उपयोग होतो आणि याच तंत्राला किंवा पद्धतीला एकमान पद्धती म्हणतात
उदा . 11 वह्यांची किंमत 330 रुपये तर अशा 7 वह्यांना किती रुपये लागतील ?
11 वह्यांची किंमत 330 रुपये आहे .
1. वहीची किंमत काढण्यासाठी भागाकार करूया . 330
1 वहींची किंमत काढण्यासाठी 330/11 = 30 रुपये ,
: .7 वह्यांची किंमत काढण्यासाठी गुणाकार करूया .
7 वह्यांची किंमत 30×7 = 210 रुपये , .
: . 7 वह्यांना 210 रुपये लागतील .
टीप : पुढील घटक लवकरच आपल्याला अभ्यासाठी उपलब्ध होतील.