शाळा बंद, क्लासेस बंद आणि सर्व शैक्षणिक संस्था सुद्धा बंद आहेत. कसा करावे अभ्यास ?? यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अभ्यासाचे नियोजन करणे कठीण वाटत आहे. पण मित्रांनो घाबरू नका, नियोजन करा व अभ्यास करा.
मुख्य सहा विषय
भाषा
मराठी, हिंदी आणि इंग्रजी (काही विद्यार्थ्यांना हिंदी ऐवजी संस्कृत विषय असेल)
गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र.
अभ्यासाचं नियोजन करताना दररोज सकाळी भाषा विषय आणि संध्याकाळी गणित, विज्ञान किंवा समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करू शकताय. यासाठी तुम्ही कुठल्या वारी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा याचे नियोजन सुद्धा तुम्ही करू शकता.
सोमवार – मंगळवार सकाळी भाषा विषयांपैकी मराठी आणि संद्याकाळी गणित, बुधवार – गुरुवार (सकाळी – हिंदी, संध्याकाळी – विज्ञान) आणि शुक्रवार – शनिवार (सकाळी – इंग्रजी, संध्यकाळी – समाजशास्त्रे).
वरीलप्रमाणे नियोजन केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि सगळ्या विषयांना योग्य न्याय देता येईल. यात रविवार हा दिवस तुमच्यासाठी रिकामा राहतो. यामध्ये अवघड विषयाला वेळ विभागून देवून अभ्यास करावे.
अभ्यासाला एकाग्रताची जोड
अनेक घरांमध्ये मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढावी म्हणून या गोष्टींवर गदा येते. हे अयोग्य आहे. दिनक्रमात मैदानी खेळ, किंवा टेनिस-बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ, पोहणं, सायकलिंग याला पर्याय नाही. यामुळे शरीरातलं रक्ताभिसरण वाढतं. मेंदूला ऑक्सिजन मिळतो. याचा चांगला परिणाम एकाग्रतेवर होतो. खेळापासून वंचित राहिलो तर मन इतर कोणत्याही गोष्टीत एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून अभ्यसाच्या वेळापत्रकामध्ये रोजचा वेळ या खेळांसाठी, छंदांसाठी ठेवायलाच हवा. मुलांना काही वेळ आवडीच्या आणि बौद्धिक गोष्टी करू द्या. मग अभ्यासाची वेळ ठरवली की त्यांचं मन अभ्यासासाठी एकाग्र होण्याच्या शक्यता वाढतात. जर हे करू दिलं नाही तर मनात असमाधान राहतं. मूल एकाग्रतेनं अभ्यास करू शकत नाही. जर धुसफुस, कंटाळा, अतिआनंद, अतिआत्मविश्वास, त्रास अशा भावना असतील तर लक्ष अभ्यासात लागत नाही.