पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध सूचना
याशिवाय माघील भरतीतील उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये दिनांक ०२ / ० ९ / २०२१ रोजी खाजगी व्यवस्थापनाच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे .
१. आज अखेर २६२ संस्थाकडून ७८ ९ उमेदवारांची निवड केल्याची नोंद करण्यात आलेली आहे . निवड झालेल्या सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन उर्वरित पदाच्या निवडी विषयक प्रसिद्धीची कार्यवाही दिनांक १५/०२/२०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनांना निर्देश देण्यात आलेले आहेत .
२. शिक्षक पदभरती पोर्टलवर उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र करण्याविषयीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात भरलेली माहिती अंतिम करण्याची सुविधा दिली जाणार आहे . या आधारावरच व्यवस्थापनाच्या पसंतीक्रम / प्राधान्यक्रम घेतले जातील व त्यानंतर पुढील निकालाची कार्यवाही केली जाईल .
३. TAIT – 2022 एप्रिलमध्ये घेण्याविषयीची कार्यवाही सुरु आहे .
इत्यादी सूचना आज पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.