दहावी बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, अभ्यासाचा ताण कसा टाळावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आरोग्य कसे सभाळावे, विषयानुरूप वेळेचे नियोजन करावे, अभ्यासाच्या साहित्यचा योग्य वापर, लेखन पद्धती, दहावी बारावी परीक्षेला सामोरे जाताना ! व्यवस्थापन अभ्यासाचे कसे कराल? यासारख्या महत्वपूर्ण विषयाची मांडणी करण्यासाठी सदर लेखप्रपंच करण्यात आला आहे. परीक्षाला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व पालक यांनी नक्कीच हा लेख आवर्जून वाचलाच पाहिजे.
फेब्रुवारी – मार्च महिने जवळ आले की घरोघर परीक्षांचे वारे वाहू लागतात . जशी जशी परीक्षा जवळ येत जाते तसतसा विद्यार्थी दिवसरात्र एक करून खोलीत स्वत : ला कोंडून घेतो . इतकेच नव्हे तर संपूर्ण कुटूंबच समाजापासून स्वत : ला तोडून अचानक अलिप्त वागते .
मुलांच्या अडनिड्या वयात शारीरिक बदलांबरोबरच मानसिक भावनिक बदलही मूल अनुभव लागते . परीक्षेच्या ताणाचीही त्यात भर पडते . तेव्हा मुलांना भीती घालणे , अभ्यासाचा तगादा मागे लावणे पालकांनी टाळलेले बरे .
परीक्षांच्या या काळात सगळ्यात महत्त्वाचे ठरते ते अभ्यासाचे तंत्र समजून घेणे , अभ्यास करायचा म्हणजे धडा वाचून प्रश्नोत्तरे सोडवायची इतपतच मर्यादित आहे का ? उत्तम वाचन , स्मरण , मनन , चिंतन आणि सराव या सगळ्या गोष्टींचा सार फलित म्हणजे अभ्यास हे ज्यांना आत्मसात होते , त्यांना उत्तम गुण मिळतात .
परीक्षासाठी मनाची तयारी….!
परीक्षांसाठीच खरी तयारी संकल्पाने सुरु होते , परिस्थिती कितीही कठीण असली तरी ही परीक्षा , ध्येय मी पूर्ण शक्तीनिशी Tenth and twelfth exams ऊर्जेचे मात करु शकतो . वर्षभर नियमीत शाळेत , कॉलेजला , क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पूरक साहित्याचा साठा नक्कीचच असतो . तो बारकाईने अभ्यासला गेला पाहिजे .
अभ्यास साहित्य विषयी थोडक्यात…
नोटस् , गाईड , टेस्ट सिरीजमधील पेपर , मागील वर्षाचे पेपर असे खूप साहित्य जमवून ठेवण्यात विद्यार्थी तरबेज असतात . पूरक साहित्याचे अध्ययन नीट झाले की त्या विषयात हातोटी मिळवता येते . कुठल्याही विषयाची उजळणी करण्याची प्रत्येकाची आपली एक पध्दत असते . ती व्यक्तीनुरूप बदलू शकते . साधारण : एखादा विषय अध्ययनासाठी घेतला असता ,
- त्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे वाचणे ,
- त्यात आपल्याला काय महत्त्वाचे वाटते ते स्वतःच्या भाषेत मुद्देसूद लिहून काढणे ,
- त्या धड्यात कुठल्या महत्वाच्या आकृत्या , तक्ते , नकाशे , फॉम्युले दिले आहेत त्यावर लक्ष पुरविणे ,
- काही वेळानंतर वाचलेले आपल्याल किती लक्षात राहिले ? याचा आढावा घणे , अध्ययनाची पुनरावृत्ती करताना आपल्याला कोणते मुद्दे आठवले नाहीत यावर लक्ष पुरवून त्याची उजळणी करणे ,
- आपण कुठे चुकतोय , याबाबत आढावा घेणे , आपली गणितं चुकताहेत ? की फॉर्म्युले आठवत नाहीयेत ? की सराव कमी पडतोय , हे तपासून स्वतःतले कच्चे दुवे ओळखून स्वतःच्या अभ्यास उजळणीत सुधारणा करून आणणे , हे सगळे महत्त्वाचे ठरते .
परीक्षेच्या दृष्टीने लेखन सराव व लेखन पद्धती
भाषा विषयाची उजळणी जर आपण करणार असू तर त्या विषयात पाठ्येतर अवांतर वाचनास मुद्दे स्वतःच्या शैलीत मांडण्यास खूप महत्त्व असते .
- निबंधाचा सराव करायचा ठरविला तर निबंधाची सुरुवात , शेवट उल्लेखनिय , आकर्षक होईल याकडे आपण बघितले पाहिजे .
- परीक्षेदरम्यान वेळेचे भान राखणे खूप महत्त्वाचे ठरते . प्रश्नांची उत्तरे जरी येत असली तरी मुद्देसूद ,
- नेमक्या शब्दांत विशिष्ट वेळेतच ती लिहिली जायला हवीत . यासाठी सरावतंत्र उपयोगात आणता येते .
- जितका तुमचा सराव जास्त , तितकी तुमची उत्तरे सुसूत्र ! आकृत्या , तक्ते , व्याख्या दिलेली उदाहरणे , हाताखालून जाणे , त्याचे लेखन सवयीचे होणे फार गरजेचे आहे .
- व्याख्या लिहिताना फाफटपसारा न लिहिता पुस्तकात दिलेली नेमकी व्याख्या तशीच्या तशी लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात . या नेमक्या लिखाणाची हातांना सवय हवी .
- गणिताच्या सरावासाठी सातत्य राखणे फार महत्त्वाचे ठरते . स्टेप्स न चुकवता उत्तर अचूक येणे , पूर्ण गुण देणारे असते . त्यामुळे कठीण गणिताचा सराव कामी येतो .
- शाळा , क्लास , टेस्ट सिरीज , होमवर्क , परीक्षा , जाण्यायेण्याचा वेळ अशा विद्यार्थीच्या व्यग्र दिनक्रमात फार कमी वेळ मूळ अभ्यासाकरीता , उजळणीकरीता , स्व – अध्ययनासाठी शिल्लक राहतो .
- प्रत्येक विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता , ज्ञान ग्रहण करण्याची आकलनशक्ती , ज्ञान स्मरणात साठविण्याची कौशल्ये , ते ज्ञान पुन्हा वापरु शकण्याचे तंत्र वेगळे असते .
- त्यानुरूप त्यांची अभ्यास कौशल्येही बदलतात . सुरुवातीपासूनच स्व – अध्ययनाची गोडी विद्यार्थ्यांना लागली असेतल तर अभ्यासाचे आणि वेळेचे गणितही जुळून येते .
- थोड्या वेळात जास्त अभ्यास होतो . उत्तरपत्रिकेतील गिचमिड अक्षर , खाडाखोड मनातील संभ्रम दर्शवितात . तेव्हा ते टाळणेच योग्य , मुलांच्या शालेय विकासात पालक सुयोग्य हातभार लावू शकतात .
विदयार्थ्यांची मानसिक ओढाताण कमी करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे
मुलांच्या या अडनिड्या वयात शारिरीक बदलांबरोबरच मानसिक , भावनिक बदलही मूल अनुभवू लागते . परीक्षेच्या ताणाचीही त्यात भर पडते . तेव्हा मुलांना विश्वासांत घेऊन , संवाद साधून , अभ्यासाचे महत्त्व जर पटवून दिले असेल तर परीक्षांच्या वेळी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे , त्यांना धीर देणे , त्यांची मानसिक ओढाताण कमी करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे या सर्व भूमिका पालक उत्तमरित्या निभावू शकतील . संपूर्ण तयारीनिशी परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे उत्तुंग शिखर गाठणे नक्कीच शक्य आहे . इयत्ता १० वीची लेखी परीक्षा मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात तर १२ वी ची फेब्रुवारीमध्ये सुरु होते . तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेपूर्वी १५ दिवस अगोदर असतात .