दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर ” या ” तारखेला कोर्ट निर्णय! 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर " या " तारखेला कोर्ट निर्णय! 

Board Exam 2022 : दहावी बारावी बोर्ड परीक्षा काही दिवसावर येऊ घातल्या असताना, विद्यार्थी आंदोलन करीत ऑफलाईन परीक्षा घेण्याला विरोध करीत आहेत. या संदर्भात एक याचिका ही कोर्टात दाखल कारण्यात आली. सदर याचिका लवकर निकालात काढली जाणार असून साधारण सात दिवसाच्या आत यावर निर्णय होणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.

दरम्यान महाराष्ट्र बोर्डासह सीबीएसई, आयसीएसी, एनआयोएस या बोर्डाचे विद्यार्थी देखील ही मागणी लावून धरत असून विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द होणार कि पुढे ढकल्या जाणार याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे.

दहावी बारावी परीक्षा रद्द करण्याच्या याचिका संदर्भात युक्तीवाद करताना,‘ बोर्ड परीक्षा २०२२’ च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करोनाची भीती वाटत असल्याचे सांगण्यात आले आहे.याशिवाय पुढे यात युक्तीवाद करताना, वर्ग ऑनलाइन होतात, मग परीक्षापण ऑनलाइन व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे .

Spread the love

Leave a Comment