HSC Exams Update : इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनासाठी एक महत्वाची अपडेट आहे. परीक्षा मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करत,बारावीच्या 5 आणि 7 मार्चचे पेपर रद्द करून ; त्या पेपराच्या नवीन नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. याबाबत बोर्डाकडून अधिकृतरित्या जाहीर कारण्यात आले आहे. या बाबत सर्व विद्यार्थी आणि पालकांना, शाळा सूचित कारण्यात आले आहे.
दरम्यान संगमनेर येथे महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली होती, या आगीत सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे पेपर रद्द केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या प्रश्नपत्रिका मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणल्या जात असताना ट्रकला आग लागली. यामुळे भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शाळा कॉलेजशी संपर्क करण्याचे अहवान कारण्यात आले आहे.