दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट ; निकालाच्या तारखा संदर्भात शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती जाहीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट ; निकालाच्या तारखा संदर्भात शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती जाहीर

शैक्षणिक अपडेट : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या असून आता विद्यार्थ्यांसह पालकांचे सारे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान , दहावी-बारावीच्या निकाला बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती जाहीर केली आहे. शेवटचा पेपर झाल्यानंतर 60 दिवसांत निकाल जाहीर करणं बंधनकारक आहे. याबाबत शिक्षण मंडळाने नवीन माहिती जाहीर केली आहे. 

यंदा दहावी-बारावीच्या उशिरा लागणार अशी चिंता व्यक्त केली जात होती, त्याचे कारण पेपर तपासणीच्या कामावर शिक्षकांनी बहिष्कार घातला हाेता. मात्र जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करणार असल्याची खात्रीलायक माहिती बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संभाव्य तारखा.

बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत, दहावीचा 20 जूनपर्यंत लावण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात असून तशी तयारी सुरु असल्याचे समजते. अंतर्गत सूत्रानुसार ‘दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालंय, त्यामुळे आता निकाल बनवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षेचे निकाल वेळेतच म्हणजे 10 जूनपर्यंत बारावीचा, तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

  • दहावी परीक्षा कालावधी – 15 मार्च रोजी सुरु झाल्या व 4 एप्रिल रोजी संपल्या.
  • नोंदणी विद्यार्थी – एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
  • प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – पैकी 8 लाख 89 हजार 584 मुले , तर 7 लाख 49 हजार 487 मुलीनी परीक्षा दिली आहे.
  • बारावी बोर्डाच्या परीक्षा कालावधी – 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या.
  • प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14 लाख 85 हजार 826

 

 

Spread the love

Leave a Comment