सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला शासन निर्णय GR डाउनलोड करा
सदर शासन निर्णया नुसार, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी.
(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. (ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. (क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात येईल.
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला शासन निर्णय GR डाउनलोड करा.
शासन निर्णय GR डाउनलोड करा : क्लिक करा