विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा होणार, आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद!

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा होणार, आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद!

राज्यात मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) कोणत्याही इयत्तेच्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अणुत्तीर्ण (Fail) करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policies) आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा (Annual Examination) घेण्यात येणार

सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आलाय. पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा (Annual Examination) घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे.

अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार

दरम्यान राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने (Department of Education) शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

Spread the love

Leave a Comment