शेतीसाठी सौर पंप मिळवण्यासाठी पीएम – कुसुम योजनेमध्ये 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमेतेचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाउर्जा) यांच्या वतीनं प्रधानमंत्री कुसुम ब योजनेसाठी अर्ज करण्याचे अहवान करण्यात येत आहे . महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? इतर माहिती सविस्तर जाणून घ्या.
पीएम-कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज आवश्यक कागदपत्रे कोणती?
यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत, बँक खाते पासबूक झेरॉक्स लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 टक्के खर्च करावा लागेल. एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांसाठी 5 टक्के खर्च करणं आवश्यक आहे. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडं पारंपारिक वीज कनेक्शन नसावं. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले मात्र मंजूर न झालेले शेतकरी अर्ज करु शकतात.
Pipeline Yojana: शेतीसाठी पाईप लाईन योजना, 75% तात्काळ अनुदान मिळणार; लगेच अर्ज करा
पीएम-कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?
पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं उद्दीष्ठ आहे. महाराष्ट्रात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.
महाऊर्जामार्फत राज्यामध्ये महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपांकरिता शेतकऱ्यांन महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल दि. १७ मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज
३, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप वितरण.
पीएम- कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे आहे:-
पीएम-कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येईल.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महाकृषि ऊर्जा अभियान पीएम- कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाऊर्जामार्फत करण्यात येत आहे महाऊर्जामार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोटानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल. योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांन महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये.