शिष्यवृत्तीमध्ये होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी ठाकरे सरकारने सोमवारी ही घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यात काही शिक्षण संस्थांचाच सहभाग असल्याची बाब समोर आली होती.
शिक्षण विभागाच्या सगळ्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने आज हा निर्णय जाहीर केला.त्यामुळे शिष्यवृत्ती योजनेतील गैरप्रकार रोखले जाणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.
ठाकरे सरकारची घोषणे नुसार राज्यातील सर्व शिष्यवृत्ती योजना (scholarship schemes) आता विद्यार्थ्यांच्या आधारकार्डशी जोडण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 1 जून 2022 पर्यंत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डशी शिष्यवृत्ती योजना जोडण्याची कार्यवाही सरकारकडून पूर्ण केली जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी, तसेच राज्यातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.