महाटीईटी 2021 अपडेट्स : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२१ सुधारित वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा!

Mahatet 2021 नवीन वेळापत्रक


MahaTET 2021
: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२१ सुधारित वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आले आहे.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ ” चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते . तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे .

एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये . ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असुन सदर परीक्षा दि .१० / १० / २०२१ ऐवजी ३१/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे . सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी .

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे सुधारित वेळापत्रक

Mahatet 2021 वेळापत्रक