मूलभूत गणित कोर्स | Basic Mathematics Course

गणित विषय हा बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड किंवा रटाळ  वाटत असतो, त्याची अनेक करणे आहेत, त्यातील महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतात. त्यामुळे गणित सोडवताना अडचणी येतात व विद्यार्थी तेथेच थांबतो.  

विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात व त्यांना गणित विषयात गोडी वाढावी म्हणून ” गणित मूलभूत कोर्स ” ची रचना केली. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना गणित सोपे होऊन  नक्कीच त्यांची प्रगती होईल. 

मूलभूत गणित कोर्स

1. घटक : संख्या प्रणाली व स्थानीय किंमत 

अ ) संख्या प्रणाली : 
आज ज्या संख्याप्रणालीचा मोठ्या प्रमाणावर जगभर उपयोग होतो त्याला दशमान संख्या प्रणाली म्हणतात. 

या प्रणालीत 0,1,2,3,4 …………… 9 . अशी दहा चिन्हे वापरतात . यांना अंक म्हणतात . हे जसे अंक आहेत तशा ह्या एक अंकी संख्यादेखील आहेत . यांच्या सहाय्याने खूप मोठ्या संख्या लिहिता येतात . 

उदा . 10. ही दोन अंकी संख्या आहे . यापासून सुरुवात होऊन 11. 12 , 99 या दोन अंकी संख्यांचा गट होतो . यांच्यापुढे 100 , 101 ………….. 999. हा तीन अंकी संख्यांचा गट होतो.

अशाप्रकारे अनेक अंकी मोठ्या संख्या केवळ 10 अंकांनी लिहिता येतात . त्याच्यासाठी स्थानिक किंमत ही एक अतिशय प्रभावी युक्ती वापरली जाते .

 ब ) स्थानिक किंमत : 

एकापेक्षा अधिक अंकांच्या सहाय्याने संख्या बनताना अंक ज्या स्थानावर असेल त्या स्थानानुसार त्या अंकांची किंमत ठरल्याप्रमाणात वाढते आणि सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज म्हणजे ती संख्या होते . 

आता एक उदाहरण पाहूया –

संख्या घेऊ –   3412 ( तीन हजार चारशे बत्तीस )

 3 हा अंक हजार स्थानी म्हणून त्याची किंमत 3 ची हजार पट 3000
4 हा अंक शतक स्थानी म्हणून त्याची किंमत 4 ची शंभर पट 400 
1 हा अंक दशक स्थानी म्हणून त्याची किंमत 1 ची दहा पट 10 
2 हा अंक एकक स्थानी म्हणून त्याची किंमत 2 ची एक पट 2
म्हणजेच 3412

2.एकमान पद्धत 

सर्व सामान्य माणूस सहजगत्या एका वस्तूच्या किंमती वरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकाराच्या सहाय्याने काढू शकतो . 

जसे , एका पेनाची किंमत 5 रु . आहे . . 

: . 7 पेनांची किंमत 5×7 = 35 रु . 

तसेच अनेक वस्तूंच्या किंमतीवरून आपण एका वस्तूची किंमत भागाकार क्रियेचा उपयोग करून काढू शकतो . 

जसे , 4 शर्टची किंमत 1000 रु . :: . 1 शर्टची किंमत 1000 /4 = 250 रु . 

रोजच्या जीवनात केवळ एकावरून अनेक किंवा अनेकांवरून एक एवढ्या पुरताच व्यवहार मर्यादित नसतो . त्या दोन्हींचीही सरमिसळ असते . आपण दिलेल्या माहितीवरून एका वस्तूची किंमत काढू शकतो . अर्थात त्यात भागाकार क्रियेचा उपयोग होतो आणि त्या एका वस्तूच्या किंमतीवरून इच्छित वस्तूंची किंमत आपण काढू शकतो . अर्थात इथे , आपल्याला गुणाकार क्रियेचा उपयोग होतो आणि याच तंत्राला किंवा पद्धतीला एकमान पद्धती म्हणतात 

Read more