जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे . या संदर्भात सदर जीआर / परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून यानुसार –
२ . सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांबाबतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे .
सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांकरिता संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी , असे अपेक्षित आहे .
१ ) शिक्षकांचे रोस्टर ( बिंदुनामावली ) विभागीय आयुक्त , मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे .
२ ) रोस्टर तपासणी करुन घेतल्यानंतर रोस्टरनिहाय रिक्त पदाची यादी .
३ . जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीसंदर्भतील ऑनलाईन प्रक्रिया सुरु असताना खालील बाबींचा विचार करावा .
१ ) शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन आंतरजिल्हा बदलीकरिता पदोन्नत झालेल्या शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमतीपत्राबाबत निर्णय घ्यावा . २ ) संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील अ.क्र .६ येथे नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणारा शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचा आहे किंवा कसे याबाबतची खात्री करुनच संमती देण्यात यावी . प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव .
३ . उपरोक्त परिच्छेद क्र .
२ प्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक १०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता आपण घ्यावी .
डाउनलोड परिपत्रक | येथे क्लिक करा |