इ. 5 वी व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा जिल्हा परिषद व मनपा निधीतून उपलब्ध करुन देणार, शासकीय परिपत्रक जाहीर.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच ही सेस फंडातून मिळणार!

इ. 5 वी व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा जिल्हा परिषद व मनपा निधीतून उपलब्ध करुन देणार, शासकीय परिपत्रक जाहीर.
जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता विकासाकरीता जिल्हा परिषद सेस फंड, मनपा/ इतर निधीतून परीक्षा परिषद निर्मित ‘मार्गदर्शिका संच उपलब्ध करुन देण्यात यावेत अशा आशयचे एक परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी काढले आहे.

सदर परिपत्रका नुसार जिल्ह्यात इ. 5 वी व इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहित करण्याबाबतच्या उपाययोजना आपल्या स्तरावरुन करण्यात याव्यात अशी विनंती आहे. यासाठी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड / मनपा निधीतून अदा केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.

सद्यस्थितीत संदर्भ क्र. 3 च्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा फायदाही विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात निश्चितच होईल.

परिपत्रक डाउनलोड – क्लिक करा 

5वी व 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची! शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ.

शिष्यवृत्ती परीक्षा 2023

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. सदर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इ. 8वी) शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज व नियमित शुल्क ऑनलाईन भरण्याची अखेरची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास व नियमित शुल्क भरण्यास उशीर झाल्यास विलंब शुल्क 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान भरावे लागणार आहे. तर अतिविलंब शुल्क 26 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान भरावे लागणार आहे.

दरम्यान या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु अजूनही शाळांनी ऑनलाईन माहिती आणि अर्ज भरले नसल्या कारणाने ही मुदतवाढ देण्यात आली असून आता संबंधित शाळांनी आपली माहिती व अर्ज दिलेल्या मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करा.

शिष्यवृत्ती परीक्षा 2023

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8) शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना – www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इयत्ता 5 वी व 8 विद्यार्थ्यांसाठी MSCE ने मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू आणि सिंधी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम PDF स्वरूपात उपलब्ध करुन दिला आहे.

इ . ५ वी व इ. 8 शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करा 

मराठी माध्यम 

इयत्ता  अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा 

इंग्रजी माध्यम

इयत्ता अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा 

हिंदी माध्यम

इयत्ता अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा 

उर्दू माध्यम

इयत्ता अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा

कन्नड माध्यम

इयत्ता अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा

तेलुगू माध्यम

इयत्ता अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा

सिंधी माध्यम

इयत्ता अभ्यासक्रम डाउनलोड करा 
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा येथे क्लिक करा 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) येथे क्लिक करा

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा तारीख जाहीर, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरु.

शिष्यवृत्ती परीक्षा 2023

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ची तारीख जाहीर कारण्यात आली आहे. प्रसिद्ध अधिसूचने नुसार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व
https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार असून १५ डिसेंबर पर्यंत नियमित शुल्कसह अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर विलंब व अतिविलंब शुल्क आकरले जाणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2023

अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज करा  येथे क्लिक करा