राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवणार ‘महावाचन उत्सव-२०२४’, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची बँड ॲम्बेसेडर म्हणून निवड

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवणार ‘महावाचन उत्सव-२०२४’, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची बँड ॲम्बेसेडर म्हणून निवडराज्यातील शैक्षणिक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास शासननिर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.सदरच्या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यासदेखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते.

तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबवण्याबाबतचा निर्णय २२ नोव्हेंबर २०२३ रोजी शासननिर्णयाने घेण्यात आला होता.

गेल्या वर्षी ५ डिसेंबरला या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामध्ये ६६ हजार शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमास रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते.

२०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी, इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहे.

२२ जुलै २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा असल्याचे शासननिर्णयामध्ये म्हटले आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

असे असेल उपक्रमाचे स्वरूप

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र करतील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करून वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार च्या पोर्टलवर अपलोड करतील.

यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल. उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारी एक मिनिटाची व्हिडीओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.

वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरवण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गटशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची असेल.

अशी आहेत उद्दिष्टे :

■ वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.

■ विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.

■ मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.

■ दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.

■ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे.

■ विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.

SSC HSC UPDATE 2024 – निकालापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट.

10वी बोर्ड निकाल 2023 जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बरावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. SSC HSC 17 no. form examine fees

नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट पासून लागू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहेत

राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. 17 नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये केलं आहे. तर, 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात 110 रुपयांची वाढ केली आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींना मिळणार तीन हजारांपर्यतची शिष्यवृत्ती; योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींना मिळणार तीन हजारांपर्यतची शिष्यवृत्ती; योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

विदयार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे. शाळेतून मुलींची गळती कमी होऊन दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहण्यासाठी शासनाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली असून याअंतर्गत ६०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी विद्यार्थिनींची माहिती शाळांतर्फे समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात आल्यावर शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची माहिती

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात. आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

एससी प्रवर्गातील मुलींना ६००, तर इतरांना अडीच ते तीन हजार या प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते तर राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत विद्यार्थ्यांना १५०० हजार रुपये मिळतात. त्याशिवाय इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येतात.

पात्रतेचे निकष काय?

शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल, शाळेतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे

राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक ही कागदपत्रे आवश्यक असतात. ही सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध असते. शाळांमधील शिक्षकाचीही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. त्याठिकाणी तपासणी करून संबंधितांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

असा घ्यावा या योजनेचा लाभ

सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिष्यवृत्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नावे किंवा प्रस्ताव सादर करावीत.

इयत्ता दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतरच, शिक्षणमंत्र्यांची घोषणा.

इयत्ता दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतरच, शिक्षणमंत्र्यांची घोषणा.

लहान गट ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विदयार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती.

दरम्यान बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते.

राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

नवा पूर्व प्राथमिक विभाग
●बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
●त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, असेही ते म्हणाले. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

SSC HSC Bord Exam 2024 : इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

SSC HSC Bord Exam 2024 : इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

इयत्ता 10वी, 12वीच्या विदयार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक नवीन जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.SSC HSC Bord Exam 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होतील.

माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाई परीक्षा (१२वी) – बुधवार, दि. २० मार्च ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) – शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.

तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दहावी, बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न मध्ये बदल, वर्षातून दोनदा परीक्षा होणार!

दहावी, बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न मध्ये बदल, वर्षातून दोनदा परीक्षा होणार!

Board exam pattern change: दहावी व बारावीच्या विदयार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. परीक्षा पद्धतीत हा बदल केला जाणार आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होणार आहे. Board exam pattern change

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर 10 मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागवली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर लोकांची मते काय आहेत हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन वर्षात ही नवीन पद्धत लागू केली जाणार आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र दिवाळीपूर्वी तर पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.